इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
बावडा दिनांक ३०/०९/२०२० समाज भूषण डॉक्टर लक्ष्मण आसबे यांनी क्रोमिन कांगो हेमोरिजिक फेवर(सी सी एच एफ) या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झाल्याचे गुजरात राज्यात आढळून आले गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात गिर गायी महेसाना व जाफराबादी म्हशी तसेच शेळ्या-मेंढ्या इत्यादी जनावरे येत असतात सीसी एचएफ हा आजार गुजरात राज्यातील कच्छ व बो ताड जिल्ह्यामध्ये नियंत्रणात येत नाही  तो पर्यंत गुजरात राज्यातील  या जिल्ह्यांमधून गायी-म्हशी तसेच शेळ्यामेंढ्या खरेदी करणे किंवा संभाळ करण्यासाठी आणणे संयुक्तिक राहणार नाही याबाबत महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग यांनी काढलेल्या परिपत्रकाद्वारे माहिती प्रसिद्ध करण्यात आले असून सदर माहिती बाबत सर्व नागरिकांना सी सी एच एफ या रोगाबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले डॉक्टर लक्ष्मण आसबे हे पशुवैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी तज्ञ असून या रोगापासून नागरिकांना होणारा धोका टाळावा म्हणून त्यांनी नागरिकांमध्ये या रोगाबाबत सविस्तर माहिती त्यांनी व्यक्त केली की ,कोरोनाचा कहर झालेला असताना सी सी एच एफ या रोगाचा  प्रादुर्भाव जनावरा मध्ये झाल्याचे आढळून आले आहे .



हा रोग जनावरापासून माणसांना होणारा रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव nairoव्हायरस या विषाणूमुळे होत असून गोचीड  द्वारे एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होऊन होणाऱ्या बाधित जनावरापासून माणसांमध्ये संक्रमित होतात या रोगाच्या बाधित व्यक्ती त्वरित निदान व उपचार करणे गरजेचे आहे या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे त्यासाठी सदर जनावरांचे गोठे संबंधित औषधाने स्वच्छ करणे गरजेचे आहे या रोगाने बाधित झालेल्या व्यक्ती मध्ये डोके दुखी जास्त ताप सांधेदुखी पोट दुखी उलटी वाती येणे वगैरे लक्षण दिसून येतात खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून गोचिडांचा नाश करण्यासाठी औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे बाधित पशूंचे कच्चे मांस खाऊ नये  आजारी जनावरांना उपचार करताना निर्जंतुकीकरण करून सामग्री योग्यरितीने विल्हेवाट लावावी .

आजारी जनावरांना पशुवैद्यक यांनी हॅन्ड ग्लोज, मास्क ,चष्मा इत्यादीचा वापर करावा .बाजार अगर बाहेरून आणलेल्या जनावरांची तपासणी करून घ्यावे. गुजरात राज्यातून येणारा जनावरे कच्च, बोताड जिल्ह्यांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात असल्याने तेथून येणाऱ्या जनावरे बाधित असण्याची शक्यता असल्याने सदर जनावरे सांभाळणे संयुक्तिक राहणार नाही .

कत्तलखान्यात काम करणाऱ्या व्यक्ती यांनी दक्षता घेण्याची गरजे चे आहे जनावरांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे .तालुक्यात सध्या या रोगाचा शिरकाव झालेला दिसत नाही तरी ही गोचीड निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा इत्यादी माहिती नागरिकांना होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .