शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
आज दिनांक 22/9/2020रोजी अंगणवाडी गट क्र. 04अंतर्गत म्हैसगाव बीट चे राष्ट्रीय पोषण आहार अभियान साजरा करण्यात आला. त्यासाठी अंगणवाडी सेविका यांनी भव्य रांगोळी साकारली.रांगोळी सजावटीसाठी विविध भाजी पाला व खमंग खाद्यपदार्थ वापरण्यात आले. यामध्ये गरोदर मातेचा आहार स्तनपान मातेचा आहार व आरोग्य. सहा महिन्यापर्यंत बाळाला स्तनपान आणि स्तनपानच सहामहिन्यानंतर आईच्या बाळाला आईच्या दुधाबरोबर वरच्या पुरक आहारा बाबत घरातील उपलब्ध भाज्या.दुध अंडी हा आहाराच्या विविधते बाबत व परसबागेबाबत पर्यवेक्षिका श्रीमती मोरे इंदूमती यांनी केले. बालविकास प्रकल्प अधिकारी श्री निलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबविण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री विलासराव गागरे हे होते.
तसेच उपसरपंचश्री सागर दुधाट,म्हैसगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री विष्णू खामकर, सुपरवायझर आरोग्य विभागाचे श्री संसारे भाऊसाहेब, आरोग्य सेविका दिघे सिमा, आशा सेविका मोनिका गागरे, रोहिणी हुलूळे,आंबेडकर कमल, प्रा, ग्रामपंचायत क्लार्क श्री गणेश शेलार,गणेश दुधाट,शेख जैनुदिन,तसेच म्हैसगाव बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
सर्वांनी सोशाल डिस्टंसिंगचे पालन करून झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती गोडे,सुनंदा डोखे,वनिता दुधाट, रोहिणी शेजवळ,ज्योती निमसे,सुनिता हुलूळे,यांनी परिश्रम घेतले अध्यक्ष श्री विलासराव गागरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले श्री विष्णू खामकर सरांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली

