सावळीविहीर (प्रतिनिधी) :
राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब जेजुरकर व सावळीविहीर येथील बाळासाहेब जनार्धन जपे यांची उपसभापती म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे .या निवडीबद्दल राहाता तालुकातुन त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात ही निवड करण्यात आली आहे .राहाता तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सन,२००४ला स्थापन झाल्यानंतर काही वर्षातच संपूर्ण राज्यात या कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठी भरारी घेतली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती एक नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून गणली जाते.अशा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सर्व संचालक मंडळांची सभा मा.मंत्री. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत राहाता येथील कार्यालयात संपन्न झाली. या वेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पदी भाऊसाहेब जेजुरकर तर सावळीविहीर येथील तरुण व धडाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब जनार्दन जपे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. एकमताने ही निवड झाली आहे. ही निवड झाल्यानंतर आमदार राधाकृष्ण विखे यांनी चेअरमन भाऊसाहेब जेजुरकर व उपसभापती बाळासाहेब जपे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी चेअरमन भाऊसाहेब जेजुरकर व बाळासाहेब जनार्दन जपे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आमच्यावर आमदार राधाकृष्ण विखे पाटील व सर्व संचालक यांनी ही जी जबाबदारी टाकली , ती आम्ही योग्य रीतीने व विश्वासाने पार पाडू! असे त्यांनी सांगितले. यावेळी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, सचिव उद्धव देवकर, तसेच कार्यकर्ते व कर्मचारी, काही सभासद उपस्थित होते. सोशल डिस्टंन्स व मास्क वापरत ही सभा संपन्न झाली. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पदी भाऊसाहेब जेजुरकर व सावळीविहीर चे बाळासाहेब जपे यांची उपसभापती निवड झाल्याबद्दल राहता तालुक्यातून आमदार राधाकृष्ण विखे पा, शालिनीताई विखे पा,खासदार सुजय विखे पा, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील विविध नेते ,पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्याकडून जेजुरकर व जपे यांचे अभिनंदन होत आहे.

