shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे आग लागून आख्खा संसार जळून खाक..!!


संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप) :
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील  रहिवाशी प्रभाकर भिकाजी शिंदे यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किट होऊन घराला मोठी आग लागली रविवारी १:३० ते २ च्या सुमारास ही आग लागली होती. तर शिंदे यांची रोख रक्कम, संसार उपयुक्त साहित्य आदी साहित्य जळून खाक झाले आहे. 

यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. घारगाव मध्ये प्रभाकर शिंदे व त्यांचे कुटुंब राहतात. रविवारी दुपारच्या सुमारास घरामध्ये कोणीच नव्हते त्यावेळी वीज बोर्डात शॉर्टसर्किट होऊन आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे काही मिनिटात मध्ये घराचे पत्रे फुटून आग वर निघाली व आजूबाजूच्या नागरिकांनीही आग बघून धाव घेतली व ही आग विझवली.मात्र तोपर्यंत घरातील, कपडे , धान्य ,टीव्ही, मोबाईल, कुलर, शोकेश, या सह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. 

प्रभाकर शिंदे यांचा पेढ्याचा व्यवसाय असल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी पेढा बनवण्याची मशीन घेण्यासाठी गेली दीड वर्षापासून शोकेस मध्ये पैसे साठवून ठेवले होते. मात्र ती देखील या आगीमध्ये जळून खाक झाले. शासनाने शिंदे कुटुंबीयांची मदत करावी व त्यांना सहानुभूती द्यावी.हीच शेजारच्या नागरिकांची अपेक्षा आहे.
close