प्रतिनिधी : आसावरी वायकर

शेवगाव : (दि .8) : ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे विशेष Covid 19 लसीकरण मोहीम अंतर्गत उद्या दि .9 ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील सर्व गरोदर मातांसाठी COVACCINE या लसीचे लसीकरण सत्र आयोजित केलेले आहे.


सकाळी 9 ते 5 या वेळेत हे लसीकरण होणार आहे .

लसीकरण करण्यासाठी आलेल्या सर्व गरोदर मातांना लस दिली जाईल.

तरी तालुक्यातील सर्व गरोदर मातांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ .दीपक परदेशी यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे .