शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर : कल्याण – विशाखपट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे सहा वर्षापासून रखडलेले काम त्वरीत पुर्ण करावे यासाठी पाथर्डीत मनसेच्या वतीने आज केंद्रीय भुपृष्ठ रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या चरण पुजनाचा कार्यक्रम करुन अभिनव आंदोलन करण्यात आले.
मेहेकरी ते फुंदेटाकळी पर्यंतच्या 55 कि.मी. महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षापासून रखडलेले आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सुमारे 400 लोकांचे अपघातात बळी गेले आहेत. खासदार, आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. ते सुद्धा या रखडलेल्या कामाबाबत हतबल झाले आहेत.आज अखेर मनसेच्या आयोजित केलेल्या अभिनव आंदोलनासाठी सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी पाठिंबा दर्शवत यात सहभाग नोंदवला.आज सकाळी पाथर्डी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नाईक चौकात केंद्रीय मंत्री नितींन गडकरी यांच्या चरणांची मंत्रोपचाराच्या जयघोषात विधीवत पूजा करताना आली.महामार्गाचे काम येत्या पंधरा दिवसात सुरळीत झाले नाही तर नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी पुढील उपोषण करुन आंदोलन करणार आहे.
या पलीकडे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,खासदार डॉ सुजय विखे,आमदार मोनिका राजळे,पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे फोटो मनसेचे कार्यकर्ते गळ्यात घालून भीक मांगो आंदोलन करणार आहे.या आंदोलनातील गोळा झालेल्या पैशातून महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे असा निर्धार यावेळी करण्यात आला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

