प्रतिनिधी : रवि भगत
   
अक्कलकोट : दि .२० /    'केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे  मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचे देशभर पडसाद उमटत आहेत.आज भारतीय किसान सभा आणि सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने चपळगाव ता. अक्कलकोट येथे जिलेबी वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी शेतकरी नेते स्वामींनाथ हरवाळकर यांनी "कायदे रद्द करण्यासाठी वर्षभरापासून नेटाने लढलेल्या शेतकऱ्यांना सलाम" केले. आता केंद्र सरकारने पिकांना आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करावा,' अशी मागणी किसान सभेचे अध्यक्ष कॉ.दयानंद फताटे यांनी केली आहे.

    पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर यासंबंधी प्रतिक्रिया देताना हरवाळकर म्हणाले, संबंध वर्षभर देशातील आठशे पेक्षा जास्त शेतकरी शहिद झाले आहेत. शेतकरी संघटनांनी जो संघर्ष केला, त्या संघर्षाचा हा विजय आहे. या संघर्षामध्ये आठशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या शहिदांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्मरण या निमित्ताने होत आहे. यासोबतच जे लाखो शेतकरी दिल्लीच्या सिमांवर नेटाने लढले त्यांनाही अभिवादन करीत असल्याचे हरवाळकर यांनी म्हटलं आहे.

  या सोबत आधारभावाचे संरक्षण शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी आम्ही शेतकरी चळवळीच्यावतीने करीत आहोत असे कॉ.राजेंद्र स्वामी यांनी सांगितले.

या वेळी सोमनाथ बानेगाव, विलास बोन्द्रे, स्वामींनाथ शिरगुरे, गोपीनाथ जाधव,खंडप्पा वाले,सुभाष बावकर, परमेश्वर वाले, शरणप्पा ख्याडे,सोहेब पटेल,विजय कांबळे, मल्लिनाथ सराटे आदि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.