सोलापूर । प्रतिनिधी :
द रॉयल ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्री कर्तुत्व आदिशक्ती पुरस्कार 2022 हा सोलापूर च्या सुप्रसिद्ध मॉडेल आणि मा.सभापती डॉ.आशिष रजपुत यांच्या धर्मपत्नी मा.सौ.सीमा आशिष रजपूत यांना जाहीर झाला असल्याची माहिती रॉयल ग्रुप चे अध्यक्ष नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलतांनी सांगितले. रजपूत कुटुंब नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे.
हा पुरस्कार सोहळा पुढच्या महिन्यात अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. द रॉयल ग्रुप च्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे रॉयल च्या ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे-गायकवाड यांनी सांगितले . हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा महाराष्ट्रातील यशस्वी आयोजक नितीन झगरे यांनी आयोजित केला आहे .या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे . दिवा क्वीन ऑफ़ इंडिया आणि मिस्टर इंडिया आणि इंडिया किड्स हा मॉडेलिंग शो आहे आणि या शो मध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळयासाठी विविध क्षेत्रांतील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे .या पुरस्कार सोहळयासाठी मराठी सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहे.
ज्यांना या पुरस्कार सोहळा आणि मॉडेलिंग शो साठी नाव नोंदवायचे असेल त्यांनी 9766873917 आणि 9370931509 या नंबरवर संपर्क साधावा.जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शो मध्ये सहभागी व्हावे अशी विनंती रॉयल च्या सह आयोजिका नमिताताई पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष महाराष्ट्र सुनिल ज्ञानदेव भोसले, स्नेहल सरगर, हेमंत ज्वेलर्स पुणे श्री. हेमंत दंडगव्हाळ, यश दंडगव्हाळ ,सीमा रजपुत, कोमल नांदे ,निशा शिंदे,सरोज गजभिये, श्रद्धा दराडे, सभापती डॉ.आशिष रजपूत,दर्शना पाटील, प्रोडक्शन हेड आकाश रणदिवे, असोसिएट पार्टनर आणि एस.डी.आर.फाऊंडेशन अध्यक्षा सीमा इंग्रोळे, सुरेखा भोसले,समाजसेविका जसवीन कौर छाबडा, उद्योजक मा.ज्योतिबा ऊबाळे हे उपस्थित राहणार आहे.

