*१६१) पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता


नुकतीच गुरुपौर्णिमा संपन्न झाली. गुरूंचे महात्म्य काय असते यावर अनेक ठिकाणी चर्चा झाली. सद्यस्थितीत चर्चा चालते पण गुरुतत्त्व कोणीच लक्षात घेत नाही. तसे वागतही नाही. 
आता पहा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले आहे.

निंदेचे श्रवण नको माझ्या कानी
त्याज होऊनी बहिरा बराच मी... 
पापाची वासना नको माझ्या डोळा
त्याजहूनी आंधळा बराच मी...
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा
त्याजहूनी मुका बराच मी... 
हे जगद्गुरुंचे विचार म. गांधीजींनी  
बुरा मत सुनो, 
बुरा मत देखो, 
बुरा मत बोलो, 
असे तीन माकडांच्या माध्यमातून जगासमोर मांडले. 
पण आपण सद्या सर्वत्र तसेच मीडियावर काय बघतो? हा वरील विचार दिसतो का? तर अजिबात नाही! मग कसे व्हायचे ?
जगद्गुरूंचा विचार कोणी विचारतच घेत नाही. 
सगळीकडे ऐकायला येतात ते आरोप, निंदा, अरेरावीची, अहंकारी, शत्रूत्वाची भाषा..

प्रत्येक ठिकाणी जे नजरेत येत आहेत ते सगळे घातपात, खोट्या जाहिराती, खोटी आश्वासने, अश्लील, बिभत्स दिशाहीन दृष्ये...  

जी संभाषणे/भाषणे समोर येत आहेत त्यांतून तर अत्यंत पराकोटीचे आरोप प्रत्यारोप, धमक्या, शिवराळ आणि शत्रुत्वाच्या परिभाषेत.

येथे गुरूंच्या शिकवणीला सरळ सरळ हरताळ फासला जातो आहे असेच दिसते. 
त्यामुळे सामाजिक बंधुता, सामाजिक समरसता समोर न येता केवळ सामाजिक संभ्रम, कटुता आणि समाजातील विस्कटलेले जनजीवन आपण पाहतो आहोत.

अशा प्रकारे सामाजिक पर्यावरणाचा, सामाजिक संतुलनाचा  विनाश होत आहे.
यासाठी संत वचनांचे लोकजागरण आणि संस्काराचे बिजारोपण करणे गरजेचे आहे. 
हे करण्यासाठी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता मोहिमेत सहभागी व्हा.

लेखक... 
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने 
(देशभक्तकोशकार) पुणे मोबाईल क्रमांक ९८८१३७३५८५