गरजवंतांना  खाद्यतेल अल्पदरात वाटण्याचा संकल्प

प्रतिनिधी : संजय वायकर

अक्कलकोट : 26 / घटस्थापनेच्या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बुधभूषण फाउंडेशनचे विश्वस्त विकास राठोड यांच्या वतीने अक्कलकोट येथे अल्पदरात खाद्यतेल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .

याबाबत अधिक माहिती देताना फाउंडेशनचे विश्वस्त विकास राठोड म्हणाले की, गरीब व सर्वसामान्य वर्गातील ग्राहकांना खाद्यतेल घेण्याकरिता सोयीस्कर व्हावे या मुख्य संकल्पनेतून आम्ही घटस्थापनेच्या दिवशी 25000 लिटर खाद्यतेल अल्प दरात वाटप करण्याचा आमचा संकल्प आहे. प्रति माणूस 5 लिटर खाद्यतेल वाटप करण्यात आले.

  या उपक्रमाचे मात्र सर्व स्तरातून कौतुक होत आहे .या सामाजिक उपक्रमाचे उदघाटन जे.डी.गोल्ड चे मालक जयप्रकाश राठोड व त्यांच्या पत्नी पुष्पा राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.या उपक्रमाचा लाभ अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा असे आवाहन फाउंडेशनचे विश्वस्त विकास राठोड यांनी केले होते . 

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी लखन राठोड,वेदांत राठोड,सिद्धू मुळजे,बाळू होटकर,लक्ष्मीपुत्र कुंभार, सागर पोतदार,अली शेख,रवी सुतार, अविनाश पोतदार,हेमंत मुळे यांनी परिश्रम घेतले. फाउंडेशनचे चेअरमन अमोल दुरंदे आणि मार्गदर्शक आलिम शेख व सर्व विश्वस्त यांनी विकास राठोड यांच्या कार्याचे कौतुक केले.