प्रतिनिधी : सचिन गांधी
नगर : ८ / कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर शेतकरी भवन या ठिकाणी दक्ष पोलिस मित्र सामाजिक संघटनेच्या वतीने दिवाळी फराळाच्या निमित्ताने स्नेह भेटीगाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
नगर पारनेर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके साहेब यांनी दक्ष पोलिस मित्र संघटनेच्या कार्याची माहिती घेतली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . यावेळी सर्व मान्यवरांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, दक्ष पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष शहादेव मुंगसे, उपाध्यक्ष शारदा कुलकर्णी, तालुकाध्यक्षा आसावरी वायकर, शरद दारकुंडे, वैभव गाडीळकीर,सुहास नगरे,वैभव नगरे,वृध्देश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, जन आधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, शिवाजी लगड, पत्रकार संजय वायकर, विनायक गुरसाळी , किशोर चाकोते , गणेश मराठे, रफीक शेख, सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के, गजुभाऊ भांडवलकर, सोमनाथ वाघमारे, बाळासाहेब भवर, दिपाली जाधव, आशा शेख, कमलेश काळे,विशाल वाळके,वरखेड देवस्थानचे अध्यक्ष कडू गोरे पाटील, मोहन गायकवाड ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व दक्ष पोलिस मित्र सर्व सभासद उपस्थित होते.

