प्रतिनिधी : संजय वायकर

पारनेर : १० /   पारनेर तालुक्यातील सुपा येथील बालाजी क्लिनिकल लॅबोरेटरीच्या वतीने बुधवार दि . १४ डिसेंबर ते शनिवार दि . १७ डिसेंबर  या कालावधीत अत्यल्प दरात रक्ताच्या विविध तपासण्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे बालाजी लॅबोरेटरीचे संचालक सारंग कुलकर्णी यांनी सांगितले .

या शिबिरात शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, किडनी, लिव्हर, कॅल्शिअम, काविळ, प्रोटीन, विट्यामिन प्रोफाईल, इलेक्ट्रोलाईट, ई.एस.आर, आयर्न प्रोफाईल, EGFR, पेशीचे प्रमाण, रक्ताचे प्रमाण, या तपासणीसह इ. ५८ तपासण्या होतील. DIAGNOSTICA SPAN या नामांकित  लॅब मधुन रक्त तपासुन रिपोर्ट, मिळणार आहेत. तरी नागरीकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.

या शिबिरात मुळ खर्च ८१०० रुपये असलेल्या एकुण ५८ तपासण्या अत्यल्प दरात १७५० रुपयांमध्ये तर मुळ खर्च ४४०० रुपये असलेल्या एकुण ४८ तपासण्या अत्यल्प दरात १२५० रुपयांमध्ये  केली जाणार आहे.

शिबीराच्या दिवसाची वेळ सकाळी ८ वाजल्यापासुन ते दु. २ वाजेपर्यंत राहील. एका दिवसात फक्त ४० पेशंटची तपासणी होईल. त्यामुळे किमान एक दिवस अगोदर नांव नोंदणी आवश्यक आहे. रक्त नमुना देण्यासाठी उपाशीपोटी येणे आवश्यक आहे.

नाव नोंदणीसाठी पत्ता - -
बालाजी क्लिनिकल लॅबोरेटरी सुपा- पारनेर रोड, माऊली हॉस्पिटलच्या खाली, राजेशिवाजी पतसंस्थेच्या शेजारी, ताज हॉटेलच्या पाठीमागे मु. सुपा, ता. पारनेर जि. अहमदनगर,
 संपर्क -सारंग कुलकर्णी व सौ. योजना सारंग कुलकर्णी मो.9766425853
8788815312