जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निर - निमगाव येथील अनंतराव पवार विद्यालयाचे स्वरूप दीपक साळुंखे याने मिळवला तृतीय क्रमांक.
  इंदापूर  :  अनंतराव पवार विद्यालय निर-निमगाव ( ता. इंदापूर) या विद्यालयातील  " इयत्ता पाचवीचा विद्यार्थी स्वरूप दीपक साळुंखे याने  संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य व पद्मिनी चॅरिटेबल ट्रस्ट बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आल्या होत्या या वक्तृत्व स्पर्धेमध्ये " प्रेरणा अनंत काळाची" या विषयावरील भाषण केले. लहान गटात ५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यामध्ये साळुंखे याने
तृतीय क्रमांक मिळाला. यावेळी त्यास प्रशस्तीपत्र ट्रॉफी व रोख रक्कम देण्यात आले.

 (ता.१८)  रोजी बारामती येथे शिवजयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये अनंतराव पवार विद्यालय निर निमगाव तालुका इंदापूर या विद्यालयातील  " लहान गटातील "इयत्ता पाचवीचा विद्यार्थी स्वरूप दीपक साळुंखे यांस " प्रेरणा अनंत काळाची" या विषयावरील भाषणात तृतीय क्रमांक मिळाला. त्यास मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका  मकर मॅडम व विजेता विद्यार्थी या दोघांचे संस्थेचे अध्यक्ष  दत्ताजीराव घोगरे व उपाध्यक्ष  रणजीत घोगरे, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक  गरगडे बी. जे.यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.