मराठी भाषा हस्ताक्षर स्पर्धेत जयंती महेंद्र रेडके प्रथम
इंदापूर प्रतिनिधी:मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आरोग्य संदेश प्रतिष्ठान इंदापूर व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत कु.जयंती महेंद्र रेडके हिने प्रथम क्रमांक मिळविला. दिनांक १३ मार्च २०२३ रोजी मराठी हस्ताक्षर स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अल्फाबाईट सभागृह इंदापूर येथे पार पडला. हस्ताक्षर स्पर्धेचे दुसरे वर्ष होते. २८ शाळा आणि महाविद्यालयातील ११८७७ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट उपस्थित होते.
मराठी भाषा ही अभिजात आहे. तिच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी मातृभाषा म्हणून आपल्या भावना व्यक्त करायला, अभ्यास करायला अतिशय उपयुक्त आहे. मराठी माध्यमाच्या आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी हस्ताक्षर स्पर्धेचा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे असे प्रतिपादन गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले.यापुढेही अशा कार्यक्रमाला आम्ही नक्की सहकार्य करत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी संदेश शहा,, तुषार रंजनकर , अविनाश ननवरे ,ज्योती जगताप, फौजिया शेख, सुप्रिया आगरखेड , सोरटे सर, विजेते विद्यार्थी व इतर शाळांचे शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे
गट १,) इयत्ता १ली ते ४थी.
१)कु. अंजुम जमीर शेख. ४थी
२)कु. स्वरा संभाजी पवार.४थी
३)चि. सतीश पिंटू पाटील. ४थी
गट २.) इयत्ता ५वी ते ७वी
१)कु.विष्णुप्रिया सुभाष ननवरे. ६वी
२)चि.प्रत्युष विनायक जगताप.७वी
३)चि.पियुष वैभव बोराटे. ५वी
गट ३,) इयत्ता ८वी ते १०वी
१)कु. जयंती महेंद्र रेडके. ९वी
२)कु. पूर्वा आत्माराम फलफले. ९वी
३)कु. ऋतुजा नामदेव पाटील. ८वी

