अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या सर्व प्रकारच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी- शेतकरी संघटनेचे मागणी..!!
राहुरी : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या सर्व प्रकारच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज नायब तहसीलदार सचिन औटी यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या निर्देशानुसार १ मे २०२३ ते ५ मे २०२३ पर्यंत झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने झालेले शेतमालाच्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे शासन आदेश तात्काळ रद्द करून अवकाळी पावसामुळे पिकाची झालेली नुकसान व परिस्थिती याबाबत शासन निर्णयांमध्ये नमूद केलेले फक्त उभ्या पिकांची किंवा शेतात असलेल्या मालाची पंचनामे करावे ही बाब अत्यंत चुकीची व शेतकऱ्यांच्या नुकसान करणारी असून शेतकऱ्यांनी अवकाळी पाऊस झाल्यानंतर तात्काळ शेतातील शेतमाल जेवढा हाताशी येईल त्यानुसार काढून घेतला आणि आपली शेत मोकळे केलेले आहे उर्वरित शेतमाल शेतातच खराब होऊन गेला त्यामुळे पंचनामे वेळी शेतात कोणत्याही प्रकारचे उभे पीक किंवा शेतमाल शिल्लक राहिले नाही उभ्या पिकाचे पंचनामे करा अशा प्रकारचे शासनाचे आदेश आहेत त्यामुळे महसूल कर्मचारी हे नुकसान झालेल्या व गारपिटीमुळे शेतकऱ्यांनी काढून घेतलेल्या पिकाचे पंचनामे करण्यास तयार नसून ही शासनाद्वारे शेतकऱ्यांची घोर फसवणूक असून पिकपेर नोंदीनुसार सर्वांना नुकसान भरपाई पंचनामेद्वारे मिळावी व सध्या शासन निर्णय दुरुस्ती करून योग्य ती कारवाई करावी असे या निवेदनात म्हंटलेले आहे सदर कारवाई झाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शासनाविरुद्ध आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश देठे, जुगलकुमार गोसावी ,सुनील इंगळे ,सतीश म्हसे ,राहुल करपे ,सचिन गाडगुळे ,राहुल काळे,गणेश आघाव, अभिजीत खडके, किशोर वराळे, बबनराव आघाव आदींच्या सह्या आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

