-------------------------------------
 प्रकाश मुंडे  / बीड जिल्हा प्रतिनिधी :- 
                
केज मतदार संघाच्या भाग्यविधात्या स्वर्गीय डॉ. विमल ताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त प्रती वर्षी वसुंधरा सेवा प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्या वतीने भव्य ताई महोत्सवाचे आयोजन केले जाते. याही वर्षी हा महोत्सव दिनांक 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवामध्ये भव्य सांप्रदायिक समूह भजन स्पर्धा, भव्य आराधी समूह गायन स्पर्धा, भव्य शालेय देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धा व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यात्यांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. 

भजन स्पर्धा आराधी गायन स्पर्धा व शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धा भव्य स्वरूपात संपन्न होणारा असून यासाठी संघांना दिनांक 10 ऑगस्ट 2023 पर्यंतच नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक असून केज मतदार संघातील सर्व संघांनी तात्काळ खाली दिलेल्या क्रमांकावर नोंदणी करावी. 

केज मतदार संघातील लोककलावंत भजनी मंडळ व शालेय विद्यार्थ्यांना वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिवर्षी हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील लुप्त होत चाललेल्या फळावरील चाली एकमेकांना ऐकता येतात त्याचे जतन आणि संवर्धन करता येते त्याचप्रमाणे आराधी गायन स्पर्धेच्या माध्यमातून काळानुरूप या लोककलेमध्ये होत गेलेले बदल या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व रसिकांपर्यंत पोहोचवता येतात यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून केस मतदार संघातील जास्तीत जास्त संघांनी ताई महोत्सवातील व्यासपीठावर आपली कला सादर करून रसिकांची दाद मिळवावी अशा आवाहन संयोजक नमिता ताई अक्षय मुंदडा व नंदकिशोर मुंदडा वसुंधरा सेवा प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात येत आहे.       

नोंदणीसाठी संपर्क तालमार्तंड प्रकाश बोरगावकर 75 17 66 47 61 , बळीराम चोपणे 7219250999,अनंत अरसुडे 7276189999 ,लक्ष्मण इनामदार 9552678837,महादेव सूर्यवंशी 97677802001,डॉ.वसुदेव नेहरकर 9421525530 ,महादू मस्के 9423923333 यांच्यशी संपर्क कराण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे*.