ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि ग्रामदैवत इंद्रेश्वर  श्रावणमास  समाप्ती निमित्त महाप्रसादाचे आयोजन.
 इंदापूर प्रतिनिधी: शनिवार दि.१६/९/२०२३रोजी  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी.८ ते ११.३० वा सिद्धेश्वर महारुद्र अभिषेक,
दुपारी ११.३० ते १२ महाआरती,दुपारी १ ते ५ वाजता  भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 
इंदापूर  शहरातील भाविकांच्या लोकवर्गणीतून, महाप्रसादाचे आयोजन केले जाते .सिद्धेश्वर ट्रस्ट, इंद्रेश्वर ट्रस्ट, आरती मंडळ, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ८ ते१२.३०वाजता सिद्धेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष प्रसन्न दुनाखे यांनी सपत्नीक  सिद्धेश्वर देवास महारुद्र अभिषेक करण्यात केला. त्यावेळी महारुद्राचे पठण अरविंद गारटकर सर यांनी केले, त्यावेळेस दिलीप पाठक, खरवडे रघुनाथ, श्रीकांत काका गुरव, गिरीश काका गुरव, अभिषेकास असंख्य भावीक उपस्थित होते. सिद्धेश्वर ट्रस्टीचे खजिनदार निलाखे सर, महेश भिंगे, नागेश भंडारी, कुमार शेठ ढोले, इंद्रेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष संदीप वाशिंबेकर,  ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. आरती मंडळाचे अध्यक्ष सफल घासकाटू 
उपाध्यक्ष महादेव चव्हाण सर, मार्गदर्शक 
हमीदभाई आत्तार, महाप्रसादाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. महाप्रसादाचा कार्यक्रमास इंदापूर शहरातील व्यापारी वर्ग, शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते, अधिकारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.