प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
=================
आज केज तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केज विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना आ.नामिताताई म्हणाल्या की केज तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील मुलांमध्ये क्रीडा क्षेत्रात खूप गुणवत्ता असून त्यांना सरावासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत लवकरच पिसेगाव येथे सर्व सुविधा उपलब्ध असणारे क्रीडा संकुल सुरू करू व खेळाडूंना सुविधा उपलब्ध करू तसेच मुलांसोबत मुलींनी पण खेळामध्ये सहभागी व्हावे आस अहवान त्यांनी केलं.
या वेळी त्यांनी स्पर्धेतील खो -खो चा सामना पहिला व खेळाडूंसोबत संवाद साधला या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी श्री सुनील केंद्रे अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर साहेब श्री. महादेवजी सूर्यवंशी सरपंच हनुमंत नेहरकर व मुंजाब करपे केंद्रप्रमुख चौरे सर शरद इंगळे सर नांदे सर यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद गुंड क्रीडा संयोजक यांनी केले प्रमुख पाहुणेचे स्वागत टिके सर व शेप मॅडम व जि प्र प्रा शाळा वतीने करण्यात आले केज तालुक्यातील अनेक शाळेच्या संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला असून या स्पर्धेसाठी क्रीडा मार्गदर्शक पंच म्हणून श्री बर्डे सर श्री शेप सर गिरी सर तोंडसे सर पठाण सर शुभम सर पवार सर सानप सर ठोंबरे सर हजारे सर विजय सर साजेद पठाण सर घुले सर काम पाहत आहे.