shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*श्री.पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग रोड रेस स्पर्धा पळसदेव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न.*

*श्री.पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग रोड रेस स्पर्धा पळसदेव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न.*
आप्पासाहेब यमपुरे
इंदापूर (पळसदेव ):दि.30 क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पळसदेव संचलित,श्री.पळसनाथ माध्य व उच्च माध्य विद्यालय पळसदेव आयोजित जिल्हास्तरीय शालेय सायकलींग रोड रेस स्पर्धा २०२४/२५ पळसदेव या ठिकाणी क्रीडाशिक्षक सिकंदर देशमुख व नितीन जगदाळे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक यांनी दिली.
युवा नेते कर्मयोगी व निराभिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी भेट देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
         कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव योगीराज काळे, आमसिद्ध सोलंकर तालुका क्रीडा अधिकारी, राजेंद्र काळे, पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.
         यावेळी आमसिद्ध सोलंकर , तालुका क्रीडा अधिकारी इंदापूर,आंबेगाव दीपक डोंबाळे सरपंच न्हावी,अंकुश जाधव सरपंच पळसदेव,पाटील सर मुख्याध्यापक बाबीर विद्यालय रुई,यांचा सत्कार श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व विश्वस्त यांच्या हस्ते करण्यात आला.
          जिल्हास्तरीय शालेय सायकलींग रोड रेस स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांनी केले.श्री पळसनाथ विद्यालयाचा विद्यार्थी नॅशनल खेळाडू हरीश डोंबाळे याचे कौतुक करून ओंकार गांधले सारख्या खेळाडूंना शाळेतील इतर खेळाडूंना देखील संस्थेच्या वतीने विशेष मदत करू विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाबरोबरच मैदानी खेळाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे व आपले करिअर केले पाहिजे असे संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे म्हणाले.
         यावेळी संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे,सचिव योगीराज काळे,राजेंद्र काळे, आजिनाथ पवार, अंकुश जाधव ,भालचंद्र बांडे,महेंद्र काळे, श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व विश्वस्त प्राचार्य विकास पाठक, संजय जाधव, क्रीडा शिक्षक सिकंदर देशमुख,नितीन जगदाळे रामचंद्र वाघमोडे,सुरेश बनकर अशोक जाधव संजय खिलारे अविनाश शेलार सचिन लोणकर,आप्पासाहेब यमपुरे उपस्थित होते.
         यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जाधव यांनी केले तर आभार अविनाश शेलार यांनी मानले.

 *विजेते खेळाडू पुढील प्रमाणे* :

ठिकाण-पळसनाथ विद्यालय पळसदेव
 *मास स्टार्ट अंतिम निकाल मुली* 
 ५ किमी १४ वर्ष मुली
१) वैष्णवी अमोल ठिकेकर

 *१० किमी १७ वर्ष मुली* 
१) अनुष्का विष्णू राऊत 
२) ध्रुवी योगेश शेटे
३) पायल सचिन बोचरे
 *१०किमी१९ वर्ष मुली* 
१) नेहा दीपक फापाळे
२) राजेश्वरी रमेश पवार
 *मास स्टार्ट अंतिम निकाल मुले* 
७किमी-१४ वर्ष मुले
१) शर्व संभाजी वाळके
२) दर्शन रमेश पवार
३) प्रदीप प्रकाश पोगाके
 *१०किमी १७ वर्ष मुले* 
१) ओंकार ज्योतीराम गांधले
२) शौनक संतोषकुमार महानवर
३) स्वराज सचिन कराळे
 *२०किमी १९ वर्ष मुले* 
१) हरीश दीपक डोंबाळे
२) किशोर नामदेव गोडे
३) श्रीशकुमार संतोष शिंदे

 *टाईम ट्राईल अंतिम निकाल मुले* 
 *५किमी १४ वर्ष मुले* 
१) पवार दर्शन रमेश
२) पोगाके प्रदीप प्रकाश
 *७ कमी १७ वर्ष मुले* 
१) स्वराज सचिन कराळे
२) आर्यन प्रशांत कानडे
३) शौनक संतोषकुमार महानवर
 *१५ किमी १९ वर्ष मुले* 
१) ओंकार अमोल ठिकेकर
२) श्रीशकुमार संतोष शिंदे
३) किशोर नामदेव गोडे
 *टाईम ट्राईलअंतिम निकाल मुली* 
 *५ किमी १४ वर्ष मुली* 
१) वैष्णवी अमोल ठिकेकर
 *७ किमी १७ वर्ष मुली* 
१) अनुष्का विष्णू राऊत
२) पायल सचिन बोचरे
 *७ किमी १९ वर्ष मुली* 
१) अंजली अजय कानडे
२) नेहा दीपक फापाळे
३) राजेश्वरी रमेश पवार
close