श्रीरामपूर / प्रतिनिधी:
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महापुरुषांनी आणि क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी ज्या बहादुर शूर वीरांनी आपले प्राण अर्पण केले त्यांची कृतज्ञता म्हणून तालुक्यातील माजी सैनिकांच्या वतीने ७८ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात शहीद स्मारक येथे साजरा करण्यात आला.
याप्रसंगी रिथलींग परेडच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे व शहीद स्मारक ठेवण्यासाठी माजी सैनिकांना मोठ्या प्रकारची मदत केलेले भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश अण्णा चित्ते यांच्या हस्ते शहीद स्मारकास रीथ (पुष्प चक्र) अर्पण करन राष्ट्रगीतासह झेंडावंदन करून मानवंदना देण्यात आली व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन मेजर सरदार यांनी केले सर्व माजी सैनिक व अतिथीनी वाचन करून एकतेचा संदेश दिला, उपस्थित सर्व माजी सैनिक व अतिथीनी स्मारकास पुष्प अर्पण केले, तालुका पोलिस स्टेशनचे पीएसआय संजय निकम यांची बढती झाल्यामुळे व त्यांनी ग्रामीण भागातील माजी सैनिकांना अनेक प्रकारची मदत केलेली असल्याने कृतज्ञता म्हणून त्यांचा तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या व संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला ,स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सौ. पुजा चव्हाण सरचिटणीस नगर उत्तर विभाग भाजपा सौ, मंजुषा ढोकचौळे तालुका अध्यक्ष महिला मोर्चा,सौ. पुष्पलता हरदास शहर अध्यक्ष भाजपा यांच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार लहु कानडे यांनी शुभेच्छा दिल्या.व याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजी सैनिकांना कुठलीही गरज पडल्यास मला आवाज दिल्यास मी तुमच्या पाठीशी आहे अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रम प्रसंगी पोलिस संघटनेचे राजाभाऊ सरोदे, विश्वरंजन मकासरे, सौ. मायाताई दहिमीवाळ, माजी पोलीस निरीक्षक श्री.बडवे, माजी सैनिक गोरक्षनाथ बनकर, राजेंद्र कांदे, श्रीमती, छायाताई मोटे, यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास कॅप्टन ज्ञानदेव उघडे , मेजर कृष्णा सरदार, अनिल लगड , जी.बी. बनकर, चांगदेव धाकतोडे , मेजर प्रशांत काळे , अशोक कायगुडे, राजेंद्र शिंदे , मीनानाथ गुलदगड , वीर पत्नी पार्वतीबाई देसाई , श्रीमती छायाबाई मोटे , बाळासाहेब बनकर , घनश्याम निसळ, संजय भोसले, संजय बनकर, मुकुंद कुटे ,संग्राम यादव, कैलास कोठुळे, कैलास खंडागळे, बाबासाहेब लांडे, मनोज राशिनकर, सुनील भालेराव ,राम म्हैस , विलास खर्डे, असलम शेख , रामदास वाणी, लोखंडे , विजय तोडमल, रामधन बिलवाल, अशोक साबळे, मेजर संजय वाकडे, मेजर सचिन थोरात तथा सौ, जयश्री थोरात व तालुक्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच बरोबर संजय पांडे भजपा सदस्य, श्रीराम ट्रेडर्सचे सर्वेसर्वा रामचंद्र सुगुर हे उपस्थित होते. प्रास्ताविक मेजर कृष्णा सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन मेजर संग्रामजीत यादव यांनी केले.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

