shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदिवासी समाजाची औकात काढणार्‍या मेलगर यांचेवर गुन्हा दाखल व्हावा निवेदनाद्वारे मागणी.

आदिवासी समाजाची औकात काढणार्‍या मेलगर यांचेवर गुन्हा दाखल व्हावा निवेदनाद्वारे मागणी.


एरंडोलला एकलव्य संघटनेतर्फे निषेध-तहसिलदार, पोलिस प्रशासनाला निवेदन...

एरंडोल (प्रतिनिधी) - आदिवासी समाज यांची औकात काढणार्‍या पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषणकर्ते पांडूरंग मेलगर यांचे एकलव्य संघटनेच्या वतीने निषेध करत अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे तसेच धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये आदी मागण्यांसाठी तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. 

 निवेदनात म्हटले आहे की धनगर समाज हा धनगड ह्या जमातीच्या नावाचा गैर फायदा घेत गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, उपोषण करून धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात यावे असे असंविधानिक मागणी करत आहे. गेल्या 16 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर व धनगड एकच असलेल्या याचिकेवर सुनावणी केली असता धनगर ही जात आहे व धनगड ही जमात असल्याचे सांगत धनगर समाजाची याचिका फेटाळून लावली असून केवळ मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जीआर काढण्याचे सांगत महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा असा निर्णय घेतला असून हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा एकलव्य संघटना सह महाराष्ट्रातील आदिवासी संघटना या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरतील व होणार्‍या परिणामास आपले शासन जबाबदार राहील असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणांमध्ये आदिवासी समाजाबद्दल जातीवाचक बेताल वक्तव्य करणार्‍या पांडुरंग मेलगर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली. यावेळी अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष ऋषी सोनवणे, जिल्हा संघटक पिंटू सोनवणे, जिल्हा सल्लागार भोलानाथ महाले, राहूल सोनवणे, दिलीप मोरे, प्रवीण पवार , करण सोनवणे, राजू सोनवणे, मोतीराम जावळे, निंबा मालचे यांच्यासह आदिवासी भिल समाज बांधव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close