shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

घोटी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २८ / घोटी तालुका करमाळा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आज शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी निमगाव येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी श्री विष्णू ननवरे (जनसेवा पार्टी प्रमुख), श्री धनाजी ननवरे ओबीसी नेते , श्री सोमनाथ ननवरे (ग्रामपंचायत सदस्य घोटी), श्री प्रदीप वाघमारे ( ग्रामपंचायत सदस्य घोटी),  श्री दत्तात्रय क्षीरसागर (प्रगतशील बागायतदार), श्री सागर ननवरे, श्री अनिल राऊत, श्री कुंडलिक ननवरे, श्री आजिनाथ ननवरे, श्री नवनाथ यादव, श्री शिवाजी कानडे, श्री रमेश ननवरे, श्री उमेश ननवरे, श्री संतोष कानडे, श्री गजेंद्र शेंडे,  श्री महेश राऊत, श्री भालचंद्र राऊत यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केलेल्या सर्वांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. पुढील काळात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले. यावेळी  घोटीचे सरपंच विलास राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना नवीन कार्यकर्त्यांच्या समोर मनोगत व्यक्त करताना प्रवेश केलेल्या  कार्यकर्त्यामुळे आमचे ही बळ वाढल्याचे कबुली दिली. यावेळेस घोटी गावातून आमदार संजयमामा यांना सर्वाधिक मतदान देणार असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव दादा माळी, घोटीचे सरपंच विलास राऊत, कुर्डूचे सरपंच बाळासाहेब जगताप, निंभोरे चे सरपंच रविंद्र वळेकर, बारलोणी चे माजी सरपंच संजय लोंढे, बारलोणी चे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आतकर, ग्रामपंचायत सदस्य  संतोष नवले, कोर्टी चे नेते  सुभाष अभंग, कोर्टी, उपळवाटे चे युवा नेते बाळराजे माळी, कन्हेरगांव चे धनंजय मोरे, विनायक राऊत, कांतीलाल राऊत, घोटी, अमोल भोसले, प्रशांत शेंडे, राजेंद्र भोसले, अक्षय खरात इं.  उपस्थित होते.
close