shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संताजी धनाजी कार्यकर्ता पुरस्काराणे आप्पासाहेब ढूस सन्मानित..!

देवळाली प्रवरा:-
अप्पर वैतरणेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीतून मराठवाडयाला मिळण्यासाठी आवाज उठवल्या बद्दल व त्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था च्या वतीने प्रहार चे संस्थापक अध्यक्ष आदरणिय बच्चुभाऊ कडू यांचे हस्ते असामान्य योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा देवळाली प्रवरा येथील प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांना संताजी धनाजी कार्यकर्ता पुरस्कार मधील संत गाडगे बाबा सामाजिक सेवा पुरस्कार २०२५ विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले त्याबद्द्ल प्रहार जनशक्ती पक्षाचे हार्दिक आभार धन्यवाद .. 



समवेत निरीक्षक घनश्याम पेठे सर, जिल्हा प्रमुख माऊली ज्ञानेश्वर सांगळे दक्षिण जिल्हा प्रमुख परदेशी साहेब आदी..
         छत्रपति संभाजी नगर महानगर पालिकेच्या संत एकनाथ रंगमंदिर येथे २३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ०२.०० वा. चार जिल्ह्यातील हजारो प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साक्षीने सदर कार्यक्रम संपन्न झाला.
close