shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहरातून सवाद्य मिरवणूक*

*डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त  इंदापूर शहरातून सवाद्य मिरवणूक* 
 इंदापूर :इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज च्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीर अण्णांच्या अर्धाकृती  पुतळ्याची रथातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात _आली. सकाळी आठ वाजता शाळा समिती सदस्य_ विठ्ठल ननवरे, श्रीधर बाब्रस,  प्राचार्य संजयकुमार शिंगारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील जाधव, रेश्मा शेख, सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव जाधव व छाया जाधव, पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांच्या हस्ते कर्मवीर रथाचे पूजन होऊन मिरवणुकीस सुरुवात झाली. यामध्ये विद्यालयातील जवळपास 700 विद्यार्थी सहभागी झाले. जहांज पथक, लेझीम पथक व टिपरी नृत्य मिरवणुकीमध्ये विशेष आकर्षण ठरले. विद्यालयातून निघालेली मिरवणूक रामवेस- पोरा पोरांची चावडी - आंबेडकर चौक- नेहरू चौक- खडकपुरा- नगरपालिका -चाळीस फुटी रोड -दर्गा मज्जिद चौक- संभाजी चौक या मार्गे परत विद्यालयात दाखल झाली.  राजश्री मखरे व अशोक मखरे,भरत शहा, विकास शिंदे, प्रवीण ननवरे,तसेच जागोजागी माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक यांनी कर्मवीरांना अभिवादन केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांच्या व रयत शिक्षण संस्थेच्या घोषणा देऊन इंदापूर शहर दुमदुमून सोडले. मिरवणुकीनंतर सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण  आहार व महिला बचत गटाच्या वतीने  स्नेहभोजन देण्यात आले. कै.धनंजय वाशिंबेकर यांच्या परिवाराच्या वतीने गोड खाऊचे वाटप करण्यात आले. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
close