एरंडोल : रा.ति. काबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील शिवकरण राठी यांना शाळा न्यायीकरण विभाग, नाशिक यांच्या आदेशानुसार कार्यभार ताबा देण्यात आला.
23 ऑक्टोबर रोजी एरंडोल पोलीस स्टेशनचे निरीक्षक निलेश गायकवाड व गटशिक्षणाधिकारी प्रतिनिधी सुनील महाजन यांच्या उपस्थितीत छायाचित्रण पूर्ण करून ताबा देण्याची प्रक्रिया पार पडली.
माजी प्रभारी मुख्याध्यापिका दीपा काबरे यांच्या पदमुक्तीनंतर न्यायविभागाच्या आदेशानुसार सुनील राठी यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला.
कार्यभार सोपविताना संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र काबरे, सचिव राजीवभाऊ मणियार, सहसचिव धीरजभाऊ काबरे, शालेय समितीचे चेअरमन अनिलभाऊ बिर्ला , इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन डॉ. नितीनभाऊ राठी, स. न. झवर पाळधी विद्यालयाचे चेअरमन सुनीलभाऊ झवर, तसेच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य परेश बिर्ला, सतीश पैलवान व शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते.


