चालत राहा, निरोगी राहा आणि मिळवा १००% प्रीमियम परत! जाणून घ्या 'आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स'च्या क्रांतीकारी 'हेल्थ पोर्ट महोत्सवा'ची वैशिष्ट्ये
नगर प्रतिनिधी:
आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात आजारपण कधी दार ठोठावेल, हे सांगता येत नाही. त्यातच गगनाला भिडणारा वैद्यकीय खर्च पाहता, कोणत्याही आजारपणात सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट अक्षरशः कोलमडून जाते. वर्षानुवर्षे साठवलेली पुंजी हॉस्पिटलच्या एका बिलात संपुष्टात येते. मात्र, आता हॉस्पिटलच्या अवाढव्य बिलांची चिंता कायमची मिटणार आहे. कारण, 'आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स' (Aditya Birla Health Insurance) ने एक अत्यंत नाविन्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि ग्राहकांच्या फायद्याचा 'अॅक्टिव्ह वन' (Activ One) प्लॅन सादर केला आहे.
पहिल्या दिवसापासूनच ७ गंभीर आजारांना कव्हर
अनेकदा हेल्थ इन्शुरन्स काढल्यानंतर जुन्या किंवा गंभीर आजारांना कव्हर मिळण्यासाठी ग्राहकांना २ ते ४ वर्षे वाट पाहावी लागते. मात्र, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सच्या या विशेष पॉलिसीमध्ये पहिल्या दिवसापासूनच (Day 1) ७ दीर्घकालीन आजारांना संरक्षण मिळते. यामध्ये दमा, ब्लड प्रेशर (रक्तदाब), कोलेस्टेरॉल, मधुमेह (डायबेटिस), COPD (फुफ्फुसांचे आजार), लठ्ठपणा आणि अगदी अँजिओप्लास्टी (१ वर्षापूर्वी केलेली) यांसारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे.
निरोगी राहा आणि मिळवा १००% प्रीमियम परत!
या पॉलिसीचे सर्वांत मोठे आणि क्रांतीकारी आकर्षण म्हणजे 'हेल्थ रिटर्न्स' (Health Returns™). विमा कंपन्या सहसा आजारी पडल्यावरच पैसे देतात, पण आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला तंदुरुस्त राहिल्यास चक्क बक्षीस देते! जर तुम्ही दररोज १०,००० पावले चालण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले, तर पुढील वर्षीच्या पॉलिसी नूतनीकरणावर (Renewal) तुम्हाला १००% पर्यंत सूट मिळू शकते. म्हणजेच, पुढील वर्षी तुम्हाला प्रीमियम भरण्याची गरज नाही,
पैशांची कमतरता भासणार नाही; 'सुपर नो क्लेम बोनस' आणि 'अनलिमिटेड रिस्टोरेशन'
जर तुम्ही वर्षभरात कोणताही क्लेम केला नाही, तर 'सुपर नो क्लेम बोनस' अंतर्गत तुमची विमा रक्कम दरवर्षी १००% ने वाढून तब्बल ५००% पर्यंत वाढते. सोप्या भाषेत सांगायचे तर, आज तुम्ही १० लाखांची पॉलिसी घेतली आणि क्लेम आला नाही, तर ५ वर्षांत तुमची पॉलिसी ५० लाखांची होईल, आणि त्यासाठी प्रीमियम मात्र तोच राहील! तसेच 'अमर्यादित रिस्टोरेशन' (Unlimited Restoration) च्या सुविधेमुळे कुटुंबातील सदस्याला वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, तरी पैशांची कमतरता भासणार नाही.
रुग्णालयाच्या खर्चावर कोणतीही मर्यादा नाही (No Capping)
या पॉलिसीमध्ये रूम भाडे आणि आयसीयू (ICU) च्या खर्चावर कोणतीही मर्यादा नाही. सोबतच आयुष (AYUSH) उपचार, मानसिक आजार, डिलिव्हरी खर्च, आणि अवयव प्रत्यारोपणाचा संपूर्ण खर्च (कोणत्याही मर्यादेशिवाय) कव्हर केला जातो. ॲडमिट होण्याच्या ९० दिवस आधीचा आणि डिस्चार्ज नंतरचा १८० दिवसांचा खर्चही यात समाविष्ट आहे. विशेष म्हणजे आता नॉन-पेयेबल (Non-payable) रुग्णालयीन साहित्य आणि वस्तूंचा खर्चही कव्हर केला जातो.
भव्य हेल्थ पॉलिसी पोर्ट महोत्सव आणि सुलभ EMI सुविधा
तुमची जुनी हेल्थ पॉलिसी आहे आणि तुम्ही त्यातील जाचक अटींना कंटाळला आहात? तर आता 'भव्य हेल्थ पॉलिसी पोर्ट महोत्सव' अंतर्गत तुम्ही तुमची जुनी पॉलिसी (कोणत्याही कंपनीची असली तरी) आदित्य बिर्लामध्ये पोर्ट करू शकता. विशेष म्हणजे असे करताना जुन्या पॉलिसीची मॅच्युरिटी, नो क्लेम बोनस आणि सर्व फायदे सुरक्षित राहतात.
आजकाल आपण आवडता मोबाईल किंवा गाडी सुलभ हप्त्यांवर (EMI) घेतो, मग आरोग्यासाठी तडजोड का? आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स आता आकर्षक EMI सुविधेसह उपलब्ध आहे. तसेच, आता 'कॅशलेस क्लेम सुविधा' भारतातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उपचारांच्या खर्चाची कोणतीही काळजी न करता आज लाखो पॉलिसीधारक आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सच्या छत्राखाली समाधानी आणि सुरक्षित जीवन जगत आहेत. तुम्हीही आजच योग्य निर्णय घ्या आणि आपल्या प्रियजनांचे आरोग्य १००% सुरक्षित करा.
अधिक माहिती, मार्गदर्शन आणि पॉलिसी पोर्ट करण्यासाठी आजच संपर्क करा:
👤 तुषार महाजन
📞 संपर्क क्रमांक: 7666675370

