शिर्डी प्रतिनिधी: 
शिर्डी येथे गजर भक्तीचा, साईहरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. साईबाबा व विठ्ठल भक्तांच्या वतीने दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला सद्गुरू श्री साईबाबांच्या आशीर्वादाने व ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सार्वजनिक कीर्तन सोहळा आयोजित केला जातो.
या वर्षी ५६ वी कीर्तनाची सेवा रामायणाचार्य स्वरभास्कर ह.भ.प. अमोल महाराज गाडे यांच्या गोड व रसाळ वाणीतून होणार आहे. हा कीर्तन सोहळा बुधवार दि. २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

कीर्तनाचे ठिकाण साई निर्माण करिअर अकॅडमी ग्राउंड, श्रीकृष्णनगर, शिर्डी येथे ठेवण्यात आले आहे. या कीर्तनाचा व खिचडी प्रसादाचा लाभ परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी कीर्तनसेवा व महाप्रसादाची व्यवस्था समस्त कोते पाटील परिवार, ग्रंथाळा, शिर्डी यांच्या वतीने करण्यात आली असून स्वागताध्यक्ष म्हणून श्री विजय तुळशीराम कोते पाटील, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त शिर्डी यांचे सहकार्य लाभणार आहे. भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यास उपस्थित राहून साईनामाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.