प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन युवकांना संघटीत केले आहे. त्याचा अपेक्षित परिणाम निश्चितच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलेला आहे.
त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे वतीने सत्यजीत तांबे यांना महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाची राज्यसभेची उमेदवारी जाहीर करून त्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी शहर जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी यांनी केली आहे.