मराठी असे आमुची मायबोली.... २७ फेब्रुवारी जागतिक मराठी राजभाषा दिन - श्री. रमाकांत ज्ञा. तळेकर ९४०३३३३८९९ माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा हिच्या संगाने जागल्या दर्याखोर्यांतील शिळा - कुसुमाग्रज मराठी आपली मातृभाषा आहे. आणि याच मराठी भाषेचे संस्कार लहानपणापासूनच आपल्या कानांवर व मनावर होत असतात. पृथ्वीवरील संपन्न भाषांपैकी मराठी ही एक आहे . संत परंपरेने नटलेल्या या महाराष्ट्रात आपल्याला मराठी या मातृभाषेचा वारसा लाभलेला आहे. मराठीची परंपरा समृद्ध आहे महाराष्ट्रातील हजारो खेड्यांमधून आणि शहरांतून मराठी भाषा बोलली जाते. अनेक कवींनी, साहित्यिकांनी, व्यावसायिक बांधवांनी तसेच शेतकरी, कामकरी यांनी मराठी भाषेची परंपरा समृद्ध केली आहे, आणि म्हणूनच या महाराष्ट्राविषयी व मराठीविषयी आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. २७ फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन अशा असंख्य माध्यमांमध्ये मराठी प्रमाण भाषा मानली जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तसेच वाड्या, वस्त्या, तांड्यावर मराठी भाषा वेगवेगळ्या ढंगांनी बोलली जाते. तसेच आदिवासी किंवा डोंगराळ भागात मराठीची बोली खूपच निराळी असते. अनेक साधुसंतांनी सुद्धा आपल्या मराठी भाषेचं तोंडभरून कौतुक केलं आहे. "माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।" अशी संत ज्ञानेश्वरांनी प्रतिज्ञा केली, आणि ती पूर्ण केली. मराठीतील खूप प्राचीन ग्रंथ म्हणून गणला गेलेला 'विवेकसिंधू' हा ग्रंथ आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिला. मराठीतील प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार म्हाइंभट यांनी 'लीळाचरित्र' हा ग्रंथ लिहिला. तसेच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी व अमृतानुभव हे अलौकिक ग्रंथ लिहून मराठी भाषा अधिक संपन्न केली. त्याचबरोबर संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, समर्थ रामदास स्वामी अशा अनेक संतांनी मराठी भाषेची व्याप्ती वाढवली, व स्वतः कष्टमय जीवन जगून आपल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवला. व हे महत्कार्य त्यांनी मायभाषेच्याच आश्रयाने केले. अलीकडच्या काळातील साहित्यिकांनी व कवींनी सुद्धा मराठीला विविध अलंकारांनी नटवून मराठी भाषेचा गौरव केलेला आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी - सुरेश भट. जगात भाषा अनेक आहेत, व जी भाषा आतापर्यंत आपले पूर्वज हजारो वर्षे बोलत आले, जीच्याद्वारे आपला दैनंदिन व्यवहार चालतो, अशा आपल्या मायबोलीचा कधीही द्वेष करता कामा नये, म्हणून कवी कुसुमाग्रज आपल्याला संदेश देतात. परभाषेत ही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी । माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ।। भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे गुलाम भाषक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका ।।
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

