shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रिया पोवार प्रेरणा कन्या रत्न पुरस्काराने सन्मानीत

पुनाळ/प्रतिनिधी :-   जागतिक महिला दिना निमित्त सच्चा वडार कार्यकर्ता सेवा व विकास बहुउद्देशिय संस्था आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त वडार महिला सन्मान सोहळा २०२० हा  कार्यक्रम स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी आदर्श माता,आदर्श माता पिता,समाज गौरव,आदर्श कन्या रत्न इत्यादी पुरस्कार पुरस्कारार्थींना देण्यात आले.
      यावेळी कोल्हापूर येथील प्रिया गणपत पोवार यांना पुणे महानगरपालीकेचे माजी नगरसेवक किशोर विटकर यांच्या हस्ते प्रेरणा कन्या रत्न पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.


        यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील वडार महिला उपस्थिती होत्या.मुलांचे संगोपन,महिला सबलीकरण,शैक्षणिक विकास,वाढते वय आणि विवाह वधू-वर समस्या,आर्थिक विकास,शासकीय योजना,वडार समाज दशा आणि दिशा,वडार समाज चळवळ आणि महिलांचा सहभाग या विषयावर राज्यातील नामवंत व्याख्याते शोभाताई जाधव,टि.एस.चव्हाण,अशोक बंडगर,सुनिल चौगले,प्रियाताई पोवार,सुनिताताई जाधव, यांनी वरील विषयावर व्याख्याने दिलीत.
       यावेळी अशोक पवार,हरीष बंडीवडार,टि.एस.चव्हाण,दयानंद इरकल,शाम विटकर,किशोर विटकर,सदाशिव जाधव,माधूरी चव्हाण ,सचिन चव्हाण,स्वाती शेलार, अशोक विटकर, यासह पुणे व पिंपरी चिंचवड मधील वडार समाजातील माता भगीनी उपस्थितीत होत्या.

शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-
 shirdiexpress7273@Gmail.com
close