shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वातंत्र्यानंतर प्रथमच वडार महिला सन्मान सोहळा - २०२० संपन्न

पुणे - प्रतिनिधी: ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सच्चा वडार कार्यकर्ता आयोजित भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच पुणे येथे वडार महिला सन्मान सोहळा - २०२० यशस्वीपणे पार पडला.

रविवार दिनांक ८ मार्च २०२० रोजी दुपारी १२ वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, माल धक्का चौक, पुणे येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 





x
          
      या कार्यक्रमात मा. सौ. शोभाताई जाधव, सांगली, यांनी महिला सबलीकरण मा. कु. प्रियाताई पोवार, कोल्हापूर यांचे शैक्षणिक विकास, मा. सौ. सुनिता ताई जाधव, नवी मुंबई यांनी वाढते वय आणि वधू - वर, समस्या मा. प्रा. श्री. सुनिल चौगले, कोल्हापूर यांनी वडार समाज चळवळ आणि महिलांचा सहभाग तसेच मा. श्री. रमेश बेल्लम सर, पुणे यांनी वडार समाज दशा आणि दिशा यावर बहुमोल मार्गदर्शन केले. 
यावेळी कु. अनघा शिंगाडे, ठाणे, जलतरणपटू, गिनीच बुक,लिम्का बुक रेकॉर्ड,  कु. शीतल गाडी वडार, कोल्हापूर, आंतरराष्ट्रीय फुटबॉल पट्टू, कु.सलोनी वडर, सांगली, आंतरराष्ट्रीय ऍबॅकस  स्पर्धा ३ रा क्रमांक तसेच  कु. प्रियाताई पोवार, कोल्हापूर  MA, राज्य शास्त्र, Phd, app. या सर्वांना प्रेरणा कन्या रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 
तसेच समाजातील आदर्श माता म्हणून मा. श्रीमती लक्ष्मीबाई धोत्रे, सोलापूर, मा. सौ. रखमाबाई शिंदे, नवी मुंबई, मा. सौ. कल्पनाताई पवार, पुणे, मा. सौ. भीमाबाई धोत्रे, पुणे तसेच मा. सौ. सरस्वतीताई व श्री. मारूती जाधव यांचा आदर्श माता - पिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 


     
रमण देवकर, म्होरक्या चित्रपट बाल कलाकार, उस्मानाबाद, श्री. अण्णा धोत्रे, दिव्यांग कलाकार,  मा.सौ.सुनीताताई मिटकर, अहमदनगर,  मा.सौ. वैजयंताताई नलावडे, पुणे ,मा. श्रीमती शकुंतलाताई कुसाळकर, मुंबई यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर दयानंद इरकल, टि.एस चव्हाण, सौ. संगिताताई धोत्रे मा. नगराध्यक्षा तळेगाव दाभाडे, लक्ष्मण पवार पुणे, पिराजी मंजुळे, सौ. ललीता धनवटे, सौ. निर्मलाताई कुऱ्हाडे, मा.नगरसेवक किशोर विटकर, संदिप शिंदे, हरिश्चंद्र कुसळकर, हरिदास धनवडे, शरद धोत्रे, बाळासाहेब भोसले,शामराव विटकर,सदाशिव धोत्रे, अशोक विटकर, सच्चा वडार कार्यकर्ता सर्व सदस्य व महाराष्ट्रातील समाज बांंधव आणि माता-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक पवार,हरिषजी बंडीवडार,डाॅ.अशोक बंडगर सर,सदाशिव जाधव,सचिन चव्हाण ,स्वाती शेलार- कुसळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे आयोजन सच्चा वडार कार्यकर्ता यांनी केले होते.



शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा- shirdiexpress7273@Gmail.comसंपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५



close