shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी फॅक्टरी येथे भुयारी मार्ग बनवा- आप्पासाहेब ढुस


देवळाली प्रवरा - दि. १४ मार्च २०२०
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर - मनमाड महामार्गावर शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग तयार करून देणेत यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्स व समन्वय समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे. 

     देवळाली प्रवरा सोसायटी ते राहुरी फॅक्टरी रस्ता, तसेच कोल्हार पुलाच्या वाहतूक कोंडी वर उपाय म्हणून जुन्या पुलाचे जागेवर नवीन पुलाला निधी मंजुरी, आणि राहुरी फॅक्टरी ते कोल्हार या महामार्गावरील खड्डे बुजविणे आदी प्रश्न मार्गी लावल्या बद्दल महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समिती ने राज्याच्या बांधकाम विभागाचे आभार व्यक्त करून राहुरी फॅक्टरी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भुयारी पादचारी मार्ग बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 
      राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर  नगर-मनमाड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी हायस्कुल, प्राथमिक शाळा, इंजिनीअरिंग कॉलेज, पब्लिक स्कूल अश्या विविध शाळा व विद्यालयाचे विध्यार्थी, शिक्षक व पालक अश्या जवळपास तीन हजार पेक्ष्या जास्त लोकांना शाळेत जानेसाठी हा महामार्ग या ठिकाणी अत्यंत धोकादायक रित्या  ओलांडावा लागतो.  

     या चौकात अपघाताचे प्रमाण वाढले असलेने व मुलांची रस्ता ओलांडताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय समिती चे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, सचिव किशोर थोरात, कोशाध्यक्ष रामभाऊ काळे , शिवाजी घाडगे, व काही पालक  आदींनी या चौकात समक्ष हजर राहून मुलांना रास्ता ओलांडण्यास मदत करून पाहणी केली.  येथील गांभीर्य लक्षात घेता या मुलांना रस्ता ओलांडण्यास भुयारी मार्गाची तरतूद करण्यासाठी लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग,  लोकप्रतिनिधी व  राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचेसह बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन या चौकात भुयारी पादचारी मार्गाची मागणी करणार असल्याचे आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले. तसेच अलिकडेच येथे सी सी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत हा काही  उपाय ठरु शकत नाही तेव्हा भुयारी मार्ग हाच एक मेव उपाय असल्याने येथे तातडीने भुयारी मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.


शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा- shirdiexpress7273@Gmail.comसंपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५

close