shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावळीविहीर बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तिथी प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

शिर्डी। प्रतिनिधी।
      शिवजयंती निमित्त शिवसेनेच्या सावळीविहीर शाखेतर्फे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला,
         सावळीविहीर बुद्रुक येथे तिथीनुसार गुरुवारी शिवजयंती साजरी करण्यात आली ,सकाळी येथील ग्रामपंचायत जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले, यावेळी 



  शिवसेना तालुका युवा शाखेचे उपप्रमुख किरण जपे, शिवसेना शाखाप्रमुख दिनेश आरणे, अतुल चव्हाण, अक्षय चव्हाण ,विवेक जपे, विशाल लकारे ,ऋषी जपे, भरत थोरात ,साईप्रसाद मिजगुले, राहुल आरणे ,ऋषिकेश जाधव, आदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, यावेळी बाळासाहेब जपे ,शांताराम जपे, विलास आगलावे, बाळू गमे ,डोखे मामा, चंद्रकांत जपे, नितीन  जपे, बापू जपे , सुभाष फाजगे,  विक्रम आगलावे , राजेंद्र गडकरी आदी शिवप्रेमी नागरिकांनी ही यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले, त्यानंतर शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय ,तसेच जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला, यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली त्यानंतर येथील शिवसैनिकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन येथील विद्यार्थ्यांना शिवजयंतीनिमित्त खाऊ वाटप केले ,

 यावेळी शिवसैनिक तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते, शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती येथील शिवसेना शाखा प्रमुख दिनेश आरणे यांनी दिली, शिवजयंतीनिमित्त गावात विविध फ्लेक्स बोर्ड ,भगवे झेंडे, पताका लावण्यात येऊन सर्वत्र भगवेमय वातावरण करण्यात आले होते,

शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच                       जाहिरातीसाठी संपर्क करा-
          shirdiexpress7273@Gmail.com
close