shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मास्‍क व हॅन्‍ड सॅनेटाइजर या वस्‍तूंचा जीवनावश्‍यक वस्तूमध्‍ये समावेश


            अहमदनगर दि.18-केंद्र शासनाने दि. 13 मार्च 2020 रोजीच्‍या अधिसूचनेनुसार जीवनावश्‍यक वस्‍तू अधिनियम 1955 अंतर्गत मास्‍क ( 2 प्‍लाई यव 3 प्‍लाई सर्जिकल मास्‍क, एन 95 मास्‍क) व हॅन्‍ड सॅनेटाइजर या वस्‍तूंचा दिनांक 13 मार्च 2020 पासून दिनांक 30 जून 2020 पर्यत जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणून समावेश करण्‍यात आलेला आहे.
            मास्‍क व हॅन्‍ड सॅनेटाइजर यांचा  समावेश कोरोना उद्रेकाच्‍या  पाश्‍वभूमीवर जीवनावश्‍यक वस्‍तू अधिनियम 1955 अंतर्गत जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणून करण्‍यात आलेला आहे.  केंद्र शासनाचे उपभोक्‍ता मामले खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांचेकडील  अधिसूचनेप्रमाणे मास्‍क व हॅन्‍ड सॅनेटाइजर  यांचे उत्‍पादन, गुणवत्‍ता, वितरण व वाहतूक यापुढे जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणून नियंत्रित करण्‍यात येणार आहे.


            सर्व मास्‍क व हॅन्‍ड सॅनेटाइजरचा अनधिकृत साठा करणे, अधिकतम विक्री किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री करणे तसेच अयोग्‍य दर्जा  असलेल्‍या मास्‍क  व हॅन्‍ड  सॅनेटाइजर यांची विक्री करणे  या सर्व बाबी जीवनावश्‍यक वस्‍तू अधिनियम मधील कलम 3 चे उल्‍लंघन समजून अधिनियमातील कलम 7 अन्‍वये कायदेशीर फौजदारी कारवाई करण्‍यात येईल. याची सर्व औषध विक्रेते (होलसेलर व रिटेलर) यांनी  नोंद घ्‍यावी. तसेच मास्‍क व हॅन्‍ड सॅनेटाइजर यांचा अनधिकृत  साठा करणे अधिकतम विक्री किमंतीपेक्षा अधिक दराने विक्री करणे  व अयोग्‍य दर्जा असलेल्‍या मास्‍क व हॅन्‍ड सॅनेटाइजर यांची विक्री करणे अशी बाब आढळल्‍यास तात्‍काळ जिल्‍हा प्रशासनाशी संपर्क करण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.


शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-

 shirdiexpress7273@Gmail.com


संपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५

close