वासिम । प्रतिनिधी
धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी शहिद झालेल्या शहीद योगेश कारके यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त (12ऑगस्ट) धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती धनगर साम्राज्य सेनेचे वाशीम जिल्हा अध्यक्ष शुभम ढवळे यांनी दिली.
शहीद योगेश कारके
गोमकेवाडी तालुका सेलू जी परभणी येथील 18 वर्षीय युवक योगेश राधाकिशन कारके याने धनगर समाजास आरक्षण मिळत नसल्याच्या कारणावरून 12 ऑगस्ट 2018 रोजी आपली जीवनयात्रा संपवली होती. यानंतर प्रशासनाने योगेशच्या कुटुंबीयांची भेट घेत मदतीचे लेखी आश्वासन दिले होते पण ते आज पावेतो पूर्ण झालेले नाही.
शहीद योगेश यांच्या स्मृतिदिनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ ,युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आशितोषभाऊ शेंडगे, विदर्भ प्रदेशचे संपर्क पमुख श्रीकांत भुजाडे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राहुल धनगर, पश्चिम महाराष्ट्राचे महादेव बुट्टे, सौरभ भांड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण अभियान होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर समाज सेनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

