shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शून्यातून केली उद्योगाची प्रगती - रहिमान शेख यांची यशोभरारी..!!

इंदापूर । प्रतिनिधी तात्याराम पवार 
वडापुरी गावचे कष्ट व प्रयत्नशील नेतृत्व असणारे  साई फॅब्रिकेशन चे मालक रहमान शेख यांनी ग्राहकांच्या प्रतिसादातून उभारले साई फॅब्रिकेशन चे इंदापूर शहर व ग्रामीण मध्ये सात शाखा .



 2009 मध्ये भांडवल नसताना केवळ मित्रांच्या सहकार्याने साई फेब्रिकेशन या नावाने व्यवसाय सुरू केला .शून्यातून व्यवसायाला सुरुवात करून व दहा वर्षाचा व्यवसायातील अनुभव आणि ग्राहका बरोबर चे जिव्हाळ्याचे संबंध तसेच मित्रपरिवार मोठा असल्यामुळे सुरुवातीला काम मिळत गेले .परंतु मिळालेल्या संधीचे सोने करून ग्राहकाला कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त काम करून दिल्यामुळे आणि इंदापूर शहर व ग्रामीण मध्ये एक त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.ग्राहकाचा इतका विश्वास संपादन केला की साई फेब्रिकेशन या नावाच्या चार शाखा ओपन कराव्या लागल्या. कारण  क्वालिटी पूर्वक काम आणि लोकांचा विश्वास यातून लोकांनी शेख यांना ग्राहकांचा इतका प्रतिसाद मिळाला की, एका वेळी चाळीस ते पंचेचाळीस कामगार  काम करू लागले. साई फेब्रिकेशन या नावाने  सात शाखा ओपन केल्या आणि हा प्रयोग त्यांचा यशस्वी झाला. तसेच थोडा वेगळा प्रयोग म्हणून गाव तिथे शाखा असा संकल्प होता .परंतु कामगारांच्या कमतरतेमुळे सात शाखा  व्यवस्थित चालू आहेत. फॅब्रिकेशन चे काम करत असताना त्यांनी बांधकाम व्यवसाय मध्ये प्रवेश केला .आणि युनिक  या नावाने अपार्टमेंट उभी केली.बांधकाम व्यवसाय मध्ये लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळे तिथे  यश मिळाले. हे करत असताना नंतरच्या काळामध्ये  2017 साली आलिशान एन्टरप्राइझेस या नावाने पार्टनरशिप मध्ये स्वतःचे फरशीचे ग्रॅनाइट कडप्पा चे शोरूम उभे केले .तिथे ही लोकांचा विश्वास असल्यामुळे  खूप प्रतिसाद मिळाला आणि तिथे ही यशस्वी असा उद्योग व्यवसाय उदयास आलायानंतर 2019  मध्ये आलिशान पत्रा कंपनी या नावाने पार्टनरशिप मध्ये व्यवसाय सुरू केला.  ग्राहकांची ही  नाळ कधी न तुटता खूप विश्वासाने पत्रा कंपनी ही सुद्धा यशस्वी चालू  करून कोट्यावधीची उलाढाल असणारी आलिशान पत्रा कंपनी ही आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पत्रा विकणारी कंपनी म्हणून समोर आली आहे.


   
सहा महिने पूर्वीं साई रोलिंग शटर्स या नावाने व्यवसाय सुरू केला आहे .रोलिंग शटर मॅन्युफॅक्चरिंग करून संपूर्ण तालुक्यामध्ये  मटरेल पुरवत आहेत. रहमान शेख यांना सर्वात   जास्त सहकार्य जर कोणी केली असेल   तर त्यांच्या बालपणीचा मित्र श्री महेश देशमुख यांनी साई फॅब्रिकेशन वर्कशॉप सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष असे मोटिवेट केले आणि आर्थिक सहकार्य पण खूप केले. रहमान शेख यांच्या यशामध्ये निश्चितच दिलदार मनाचा मित्र श्री महेश देशमुख यांचा पण वाटा खूप मोठा आहे . तसेच नंतरच्या काळात श्री मुक्तार मुलानी यांनी विशेष सहकार्य केले.




इंदापूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध होईल .या धोरणानुसार मोठी अशी कंपनी करण्याचे  ध्येय आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देण्याचा मानस आहे. रहमान शेख यांच्या उद्योगविश्वातील कार्यकर्तृत्वाचा  नवीन उद्योजकांना उत्सहा देणारे ठरले आहे. त्यांच्या या कार्य कर्तुत्वाला लोकांकडून कौतुकाची थाप मिळत असल्याचे दिसून येते.गरिबीतून श्रीमंत कसे होता येते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे  रहिमान शेख आहेत.
close