shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै. सौ. पूजा सौरभ कुटळे यांचे निधन; पिंपरी परिसरात शोककळा

कै. सौ. पूजा सौरभ कुटळे यांचे निधन; पिंपरी परिसरात शोककळा

 मंगळवार दि. ३० जून रोजी सकाळी ८ वाजता दशक्रिया विधी; पवना नदीतीरी विधी संपन्न होणार

नगर प्रतिनिधी :
पिंपरी गाव, ता. हवेली येथील कै. सौ. पूजा सौरभ कुटळे यांचे रविवार दि. २९/०६/२०२६ रोजी देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनाने कुटळे परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.
स्वभावाने शांत, मनमिळाऊ आणि कुटुंबवत्सल असलेल्या पूजा कुटळे यांनी आपल्या प्रेमळ वागणुकीतून कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या स्मरणार्थ दशक्रिया विधी मंगळवार दि. ३०/०६/२०२६ रोजी सकाळी ८ वाजता पिंपरी गाव, ता. हवेली, जि. पुणे येथे पवना नदीतीरी होणार आहे. या प्रसंगी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे कुटळे परिवाराच्या वतीने कळविण्यात आले आहे.

त्यांच्या पश्चात पती श्री. सौरभ विष्णू कुटळे यांच्यासह कुटळे परिवार, जिरे मेजर परिवार व आप्तेष्ट असा परिवार आहे.

समस्त कुटळे परिवार, जिरे मेजर परिवार व आप्तेष्ट यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
close