सोमवारी कनकुरी येथे दशक्रिया विधी; ह.भ.प. श्री जगन्नाथ महाराज चौधरी यांचे प्रवचन
राहाता प्रतिनिधी :
राहाता तालुक्यातील कनकुरी येथील दिलीप दगडू पवार वय ५५ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कनकुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू, नात, दोन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे. दिवंगत दिलीप दगडू पवार हे श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांचे बंधू होते.
सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी कनकुरी येथील पवार वस्ती, कॅनलजवळ, ता. राहाता येथे त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे. यावेळी सकाळी ८.३० वाजता ह.भ.प. श्री जगन्नाथ महाराज चौधरी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
दिलीप पवार यांच्या निधनाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

