shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ह.भ.प. स्वामी स्वरूपानंदगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून रंगणार ५७ वी किर्तन सेवा; भाविकांनी कुटुंबासह लाभ घ्यावा असे आवाहन

गजर भक्तीचा.. साई हरिनामाचा; शिर्डीत साई हरी किर्तन सार्वजनिक सोहळ्याचे आयोजन

शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)

शिर्डी नगरीत साईभक्तांसाठी भक्तीमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारा “श्री साई हरी किर्तन सार्वजनिक सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. गजर भक्तीचा आणि साई हरिनामाचा हा पवित्र सोहळा महिन्याच्या शुद्ध एकादशीनिमित्त भाविकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.
या किर्तन सोहळ्याची ही ५७ वी सेवा असून, ह.भ.प. स्वामी स्वरूपानंदगिरीजी महाराज, मुक्ताई ज्ञानपीठ, पुणतांबा यांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांना हरिनाम, संतवाणी, भक्ती, श्रद्धा आणि साईबाबांच्या कृपामार्गाचा लाभ घेता येणार आहे.

साईबाबा आणि विठ्ठल भक्तांच्या ओवीला, साई व विठ्ठल भक्तांच्या वतीने, सद्गुरू श्री साईबाबांच्या आशीर्वादाने तसेच ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सार्वजनिक किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात कीर्तनासोबतच खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून, भाविकांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून कीर्तन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

हा किर्तन सोहळा गुरुवार, दिनांक २५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण साई निर्माण करिअर अकॅडमी ग्राउंड, श्रीकृष्णनगर, शिर्डी असे आहे.

कार्यक्रमासाठी कीर्तनसेवा कै. सोन्याबापू वाजीराव पाटील कोते यांच्या पुण्यतिथीनिमित्त अर्पण करण्यात आली असून, स्वागतोल्सुक म्हणून श्री विजय तुळशीराम कोते पाटील, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त शिर्डी उपस्थित राहणार आहेत.
close