shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरुवात दिमाखात.*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरुवात दिमाखात.*
इंदापूर: जय भवानीगड विकास प्रतिष्ठान  संचलित,विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी मध्ये दिनांक 18 जून 2026 रोजी शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवात आनंददायी वातावरणात करण्यात आली,स्वागताची तयारी जय्यत करण्यात आली होती. 
उन्हाळी सुट्टी संपून पुन्हा शाळा विद्यार्थ्यांनी गजबजनार म्हणुन विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करून  व पेढा भरवून करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांना वही व पेन्सिलचे वाटप करण्यात आले. 
 
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शाळेतील पहिला दिवस आनंदाचा व उत्साहाचा असावा म्हणुन शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. 

नवीन  विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठीच्या शुभेच्छा देण्यासाठी 
संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष तथा गटनेते, जिल्हा परिषद सदस्य  श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष तथा लाखेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. चित्रलेखा ढोले, सचिव  हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार  प्रदीप गुरव 
 विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य 
 गणेश पवार,
 प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य  राजेंद्र सरगर,
 सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close