shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

कोतूळ येथे रुग्णोपयोगी साहित्य भांडाराचा शुभारंभ व महाआरोग्य शिबिराचे आयोजनपालकमंत्री ना. विखे पाटील व शंकरजी गायकर यांची उपस्थिती..!

कोतूळ : विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री स्व. अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्ताने रुग्णोपयोगी साहित्य भांडाराचा शुभारंभ व महाआरोग्य शिबिराचे आयोजन वरदविनायक देवस्थान, कोतूळ यांच्या वतीने रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री शंकरजी गायकर यांची उपस्थिती करण्यात आले आहे अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी दिली.
      समाजातील गरीब, गरजू व वंचित घटकांतील रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार मिळावा आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये, या सामाजिक बांधिलकीच्या उदात्त हेतूने श्री वरदविनायक देवस्थान यांच्या वतीने रविवारी कोतूळ पब्लिक स्कुल येथे आयोजन करण्यात आले आहे. 




       विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री स्व. अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमात रुग्णोपयोगी साहित्य भांडाराचा शुभारंभ तसेच विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी यांच्या सहकार्याने भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ९.३०  होणार आहे.
      या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहमंत्री शंकरजी गायकर, विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रांतमंत्री  किशोरजी चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक किशोरजी निर्मळ, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन (IPS), अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार  डॉ. किरणजी लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रुग्णोपयोगी साहित्य भांडार हा समाजातील गरजू रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम ठरणार आहे. रुग्णांना आवश्यक असणारे वॉकर, व्हीलचेअर, पेशंट बेड, एअर बेड, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, नेब्युलायझर, सक्शन मशीन यांसारखे विविध वैद्यकीय साहित्य अल्प सेवा शुल्कात ठरावीक कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना रुग्णांच्या उपचारादरम्यान मोठा दिलासा मिळणार आहे. या महा आरोग्य शिबिरामध्ये मेडिसिन, नेत्रचिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, शल्यचिकित्सा, त्वचारोग, कान-नाक-घसा, कर्करोग, कान-नाक-घसा संबंधित तपासणी तसेच मानसिक आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, निदान, उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हृदयविकार, मेंदूविकार, मधुमेह, दमा, मोतीबिंदू, काचबिंदू, सांधेदुखी, हाडांचे विकार, महिलांचे आजार, बालकांचे आजार, त्वचारोग आदी विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
    शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार, आवश्यक औषधांचे मोफत वाटप, आयुष्मान भारत कार्ड काढून देण्याची सुविधा तसेच पात्र रुग्णांना शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत नियमानुसार उपचार व शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन व मोफत शस्त्रक्रियां करण्यात येणार आहे.

  महाआरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांचे निदान, वैद्यकीय तपासणी, उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
   या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन विनय समुद्र, संभाजी पोखरकर, कुलदीप नेवासकर, सचिन पाटील, संतोष घाटकर, गणेश पोखरकर, विशाल बोऱ्हाडे, अजित आरोटे, अविनाश गीते, संतोष नेवासाकर यांनी केले आहे.
०००
close