shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

जिल्हयातील बेकायदा ऊस वाहतुक करणा-या वाहनावर कारवाईची मागणी

जिल्हयातील बेकायदा ऊस वाहतुक करणा-या वाहनावर कारवाई करावी अशी मागणी  माहिती अधिकार कार्यकर्ते काका पाटील गायके यांनी केली आहे.

अहिल्यानगर प्रतिनिधी:
प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात श्री.गायके यांनी म्हटले आहे की,
 अहिल्यानगर जिल्हयामध्ये  साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालु असुन अनेक सहकारी साखर कारखान्याने वाहतुकीचा करार करतांनी सदर कारखान्याने कागदपत्राची पडताळणी करुन वाहनास ऊस वाहतुकीच्या नियमानुसार परवानगी देणे हे बंधनकारक आहे. ऊस वाहतुक करतांनी ट्रॅक्टरला एक ट्रॉली बंधनकारक असतांनी डबल ट्रॉलीची वाहतुक करण्यासाठी सदर कारखान्याने कायदयाचे उल्लंघन करुन नियमबाहय वाहतुक करण्यासाठी डबल ट्रॉलीची परवानगी दिली आहे. सदर डबल ट्रॉली वहातुकीला कागदपत्र पडताळणी करुन आरटीओ ऑफीसने सदर वाहनाला वाहतुकीसाठी परवानगी दिली असेल किंवा सदर सहकारी साखर कारखाने किंवा प्रायव्हेट सहकारी साखर कारखाने यांनी तुमच्याकडुन रितशीर कायदयानुसार परवानगी घेतली असेल त्या परवानगीची सत्य प्रत मिळावी.

 तसेच जिल्हयामध्ये बेकायदा ऊस वाहतुक करणारे डबल ट्रॉली व नियमबाहय वाहतुक करणारे ट्रक व इतर वाहनामुळे अनेक लोकांना बेकायदा वाहनाच्या वोव्हर लोडींगमुळे जीव हा गमावा लागलेला आहे.  भविष्यात काही कारखान्याच्या ओव्हर लोडींग वाहतुकीमुळे काही घडल्यास त्या प्रकरणाची जबाबदारी कारखाना घेणार आहे की आरटीओ ऑफीस घेणार आहे का ? आणि  अनेक अपघात जिल्हयामध्ये झाले असुन ते ऊस वाहतुक करतांनी ओव्हरलोड गाडयामुळे आपघात हे होवू शकतात याची लोकांना नुकसान भरपाई कारखाना देणार आहे की आरटीओ ऑफीस देणार आहे ? हे लवकरात लवकर वाहनाची कागपत्र कारखानेकडून घेऊन लवकरात लवकर चौकशी अहवाल लेखी स्वरुपात मिळावा.
जिल्हाअधिकारी व  जिल्हा  वाहतुक नियंत्रण शाखेला जी निवेदन देण्यात आले आहे.
००००
close