इंदापूर : दिनांक 14 जून 2026 रोजी सोलापूर येथे ए.डी.फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाजरत्न पुरस्कार सोहळा २०२६ मोठया उत्साहात संपन्न झाला.
सदर पुरस्कार सोहळ्यात तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई नानासाहेब खरात यांना *आदर्श समाजसेविका* पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव जानकर माजी दुग्धविकास कॅबिनेट मंत्री ,श्रीकांत पाटील उपजिल्हाधिकारी धाराशिव, पोलीस उपाधीक्षक पुणे प्रदीप गोरड तसेच कार्यक्रमाचे निमंत्रक अशोक श्रीपती गोरड ,महादेव महानूर व इतर मान्यवर उपस्थित होते......
त्यांना या महिन्यात मिळालेला हा दुसरा मोठा पुरस्कार आहे पाठीमागील आठ दिवसांपूर्वी ही त्यांना पुणे जिल्ह्यात राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांचे काम हे तळगाळातील जनसामान्यांना मदत तसेच सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. कोणत्याही पदाची मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता जनसामान्यांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या , अनाथांची ताई म्हणून त्यांची ओळख आहे, एक शेतकरी कुटुंबातील महिलाही सामाजिक काम उत्कृष्ट पद्धतीने करू शकते हे त्यांच्याकडे व त्यांच्या कामाकडे पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येते त्या इंदापूर पोलीस स्टेशन येथे महिला दक्षता समिती , तसेच राष्ट्रीय सरपंच संसद व तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून लोकांची सेवा करत असतात. आतापर्यंत खूप संस्थांनी तसेच शासकीय पुरस्काराने अनिताताई यांना सन्मानित करण्यात आले आहे.

