shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराई मळा (शेळगाव ) शाळेत इयत्ता पहिलीचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराई मळा (शेळगाव ) शाळेत इयत्ता पहिलीचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा    .
इंदापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  गौराईमळा  शाळेत सोमवार दिनांक 15 रोजी इयत्ता पहिली मध्ये व अंगणवाडी मध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन त्यांचे थाटामाटात स्वागत करण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके  व गणवेशांचे मोफत वाटप करण्यात आले .यावेळी शेळगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सौ .रेश्माताई जाधव ,ग्रामपंचायत सदस्य अश्विनीताई शिंगाडे,तंटामुक्ती अध्यक्ष श्री तात्यासाहेब शिंगाडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुरेश शिंगाडे,माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल नाझरकर,राहुल नाझरकर,मनीषाताई जाधव ,वैजंता सोनवणे, अंगणवाडीताई सुनिता जाधव व गौराईमळा ग्रामस्थ उपस्थित होते   
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री अशोक क्षीरसागर यांनी केले तर आभार उपशिक्षिका सौ सुवर्णा क्षीरसागर यांनी मानले
close