shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरटीओ संपादरम्यान काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह; नागरिकांत नाराजी

श्रीरामपूर / प्रतिनिधी :
राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप तिसऱ्या दिवशीही सुरू असताना काही कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. संपामुळे विविध कामे प्रलंबित राहिल्याने वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, काही नागरिकांनी असा आरोप केला आहे की संप काळातही काही कागदपत्रांच्या हालचाली होत असून त्यामध्ये पारदर्शकता नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या झालेली कागदपत्रे नेमकी कोणाच्या ताब्यात असतात व त्यांची प्रक्रिया कशी केली जाते, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कार्यालयातील काही कर्मचारी संपात सहभागी असताना तर काही कर्मचारी सेवा सुरू ठेवत असल्याचे समजते. त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी तसेच संपकाळात कागदपत्रांची हाताळणी आणि कामकाजाबाबत पारदर्शक व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, आरटीओ कर्मचारी संप तिसऱ्या दिवशीही सुरू असून वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, ड्रायव्हिंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, वाहन कर भरणा आदी कामांवर त्याचा परिणाम झाला आहे. शासन आणि कर्मचारी संघटनांनी लवकर तोडगा काढून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

close