इंदापूर - निमगाव केतकी : दि १५/६/२६- आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरवाडी या ठिकाणी इयत्ता पहिली मधील सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला. प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य मा.श्री.रणजित भोंग यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शशिकांत मिसाळ यांचे वतीने संपूर्ण शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच मोफत पाठ्यपुस्तके व मोफत गणवेश पालकांच्या शुभहस्ते वाटण्यात आले. एक महत्त्वपूर्ण बाब विद्यार्थ्यांच्या हितासाठी माजी सरपंच नामदेव कचरे यांचे बंधू राजेंद्र माणिक कचरे यांच्या वतीने 25 हजार रुपयांच्या दहा बँचेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरवाडी या शाळेस भेट देण्यात आल्या.खाजगी शाळेत मुले टाकून विनाकारण खर्च न करता गुणवत्तापुर्ण व संस्कारक्षम शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच मिळते व मुलांना बालपण नक्कीच जगता येते अशी भावना पंचायत समिती सदस्य भोंग यांनी व्यक्त केली व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच बॅंच भेट दिल्याबद्दल राजेंद्र कचरे त्यांचाही सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला. अतिशय आनंदीव वातावरणामध्ये प्रवेशपाञ मुलांचा सन्मान करून शाळा प्रवेश करण्यात आला. प्रसंगी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबा कचरे माजी सरपंच नामदेव कचरे, सुनील बनसोडे, चंद्रकांत हेगडे सोमनाथ मिसाळ ,परशुराम सोमनाथ बरळ पोलिस पाटील महादेव बरळ ग्रामसेवक भारत मारकड यासह अनेक महिला पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कचरवाडी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक नेते संतोष गदादे यांनी केले व आभार श्रीमती रत्नप्रभा महेंद्र मिसाळ मॅडम यांनी मानले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

