*चिमुकल्यांच्या आनंदी पावलांनी सवासेवस्ती शाळा पुन्हा बहरली; प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न*
इंदापूर - सवासेवस्ती:
जि.प. प्राथमिक शाळा *सवासेवस्ती* येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या सौ. धनश्रीताई किरण पाटील , बोराटवाडी गावचे सरपंच दत्तू
अण्णा सवासे *शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे *फुगे, गुलाबपुष्प* देऊन तसेच *लेझीमच्या निनादात* जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत *पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश तसेच अंगणवाडीच्या कृतीपुस्तकांचे वाटप* करण्यात आले. शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्या *सौ. धनश्री ताई पाटील यांनी नवागत विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचा लाभ घ्यावा तसेच शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.*
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री सुनिल निकम यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीम सुरेखा फुले मॅडम यांनी केले तर
आभार प्रदर्शन श्रीम. अनिता जाधव मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पालक वर्गाने परिश्रम घेतले.शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत इ 1 ली मध्ये 22 मुलांनी व इ 2री ते 4थी या इयत्तादरम्यान 9 असे एकूण *31 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला*, त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आनंद, उत्साह आणि स्वागताच्या आगळ्यावेगळ्या वातावरणात साजरा झालेला हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची सुंदर सुरुवात ठरला.

