shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिमुकल्यांच्या आनंदी पावलांनी भोसलेवस्ती शाळा पुन्हा बहरली; प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न*

*चिमुकल्यांच्या आनंदी पावलांनी भोसलेवस्ती शाळा पुन्हा बहरली; प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न*
इंदापूर: जि.प. प्राथमिक शाळा *भोसलेवस्ती* येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास *जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनालीताई जाधव, पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग*, अंगणवाडी पर्यवेक्षिका जाधव मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे *फुगे, गुलाबपुष्प* देऊन तसेच *लेझीमच्या निनादात* जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत *पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश तसेच अंगणवाडीच्या कृतीपुस्तकांचे वाटप* करण्यात आले. शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या *सौ. सोनालीताई जाधव यांनी नवागत विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचा लाभ घ्यावा तसेच शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.*
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका आशा नष्टे मॅडम यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत ननवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन समाधान भोंग यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेंद्र भोंग, रमेश बरळ, लतीफा पठाण, मेघा दराडे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत तब्बल *४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला*, त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आनंद, उत्साह आणि स्वागताच्या आगळ्यावेगळ्या वातावरणात साजरा झालेला हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची सुंदर सुरुवात ठरला.
close