श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप संपन्न.
प्रवेशोत्सवाप्रसंगी सेल्फी पॉईंट एक आकर्षण ठरले.
इंदापूर - बावडा : श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालया च्या शैक्षणिक संकुलामध्ये 15 जून 2026 रोजी शैक्षणिक वर्ष 2026 - 27 चे मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या संकुलात प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य घोगरे डी आर यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा आपल्या प्रास्ताविकामध्ये घेतला. विद्यालयाने कला क्रीडा सांस्कृतिक व गुणवत्ता या क्षेत्रामध्ये दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे.
याविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा संस्थेचे सचिव उदयसिंह पाटील होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने अत्याधुनिक भौतिक सुविधा पुरविलेल्या आहेत तसेच पात्र व अनुभवी शिक्षक वृंद उपलब्ध करून दिलेला आहे.याचमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता या संस्थेने टिकवून ठेवलेली आहे. या शैक्षणिक संकुलातील गुणवत्तेमुळेच पूर्व प्राथमिक पासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत तब्बल 4000 विद्यार्थी शिक्षण घेताना दिसून येतात.हे शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचे शिक्षणाचे दालन उभा करून उत्तम प्रकारच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे असे मत व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळावे या उद्देशाने संस्थेने यावर्षीपासून ज्यादा मार्गदर्शन सुरू केलेले आहे.यामुळे यापुढील काळात शिक्षणाचा दर्जा निश्चितच उंचावेल असेही मत व्यक्त केले. या शैक्षणिक संकुलातील सर्व अध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्ता शिस्त व स्वच्छता या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे असेही मत व्यक्त केले.
यावेळी उदयसिंह पाटील यांनी *विद्यालयाचा संत सोपान काका स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्व अध्यापक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक किरण पाटील, स्वप्निल घोगरे, पवनराजे घोगरे, संस्थेचे माजी सचिव सुधीर पाटील,विद्यालयाचे* प्राचार्य डी आर घोगरे, उपप्राचार्य डी व्ही हसे, पर्यवेक्षक व्यवहारे एस आर व लोहकरे अर बी,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरव विनायक सर्व अध्यापक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने सेल्फी पॉईंटचे सुद्धा नियोजन केले होते. या सेल्फी पॉईंट मध्ये प्रमुखातिथी पालक व विद्यार्थ्यांनी व अध्यापकांनी आपले छायांकन काढले. विद्यार्थ्यांसाठी तर सेल्फी पॉइंट हे एक आकर्षण होते. शाळेचा पहिला दिवस व त्याचा आनंद मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी साजरा केला. प्रवेशोत्सवासाठी सेल्फी पॉईंट ही संकल्पने साठी एस टी मुलानी, आर जे शेख, सातपुते डी एल, पाटील डी ए यांनी परिश्रम घेतले. मोफत पाठ्यपुस्तक वाटप नियोजन ग्रंथपाल शामदेव घोगरे यांनी केले. प्रवेशोत्सवाची सुंदर रांगोळी सौ भोसले डी यु मॅडम यांनी काढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलानी एस टी यांनी केले तर आभार पाटील डी ए यांनी मानले. सर्व कार्यक्रमाचे छायांकन उच्च माध्यमिक विभागाचे मोहिते एस बी व श्री शेख आर जे यांनी केले.

