shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालयात नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत*

*रयत शिक्षण संस्थेच्या  कदम विद्यालयात नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत*
इंदापूर : इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी पाचवी ते बारावी अखेर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2026 27 आज पासून सुरू झाले असून या दिवसाची सुरुवात उत्साहाने व आनंदाने झाली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने प्राचार्य संजय कुमार शिंगारे यांनी शाळा समितीवर निवड झाल्याबद्दल श्री विठ्ठल ननवरे श्री विजय शिंदे व श्री कैलास कदम यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.शाळा समिती सदस्य विठ्ठल ननवरे व कैलास कदम यांनी विद्यार्थी व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी व भौतिक सुविधांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, पर्यवेक्षिका पुष्पा काळे,  पालक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी केले तर धनसिंग भोसले यांनी आभार मानले.
close